नदीचे पाणी खाली वाहत राहणे सहज आहे. पण वर उंच चढणे मात्र सूर्यकिरणाधीन आहे. तसेच जीवन हे निम्नगामी आहे. ते अध:पतित होणे सहज आहे. पण उंच जाणे म्हणजे सर्व गतीच्या वर असलेल्या मोक्षाप्रत जाणे हे सहज नाही. त्याकरिता श्रीगुरूरूपी सूर्याची गरज आहे. खालील पाणी हे दृश्य आहे, पण वर जाताना ते सूक्ष्म होऊन जाते. तशा संसारातील अवस्था दृश्य आहेत, पण मोक्ष हा अदृश्य आहे, म्हणजे अनुभवैक गोचर आहे.
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment