Sunday, 25 September 2016

अध्यात्मिक विचारधारा ४६

वेदान्तशास्त्रात जगही ज्ञेय व परमात्माही ज्ञेय आहे असे म्हटले आहे. जग ज्ञेय याबद्दल गीता अ. 18 मध्ये 'ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता' हा श्लोक प्रमाण आहे. परमात्मा ज्ञेय याबद्दल
'ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि','भूतभर्तृच तज्ज्ञेयं'इत्यादि श्लोक प्रसिद्ध आहेत. त्यात फरक एवढाच की परमात्मा हा यथार्थ ज्ञानाचा विषय या रूपाने ज्ञेय आहे. म्हणून त्याच्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो व जग अन्यथा ज्ञानाचा विषय म्हणून ज्ञेय आहे. स्वप्नातील पदार्थाप्रमाणे. म्हणून त्याच्या ज्ञानाने बंध प्राप्त होतो..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर

No comments:

Post a Comment