जगात तीन प्रकारच्या वस्तू आहेत. काही झालेल्या उदा. पर्वत, समुद्रादिक, काही केलेल्या, उदा. घटादिक व काही भासलेल्या. उदा. रज्जूसर्प शुक्तिरजत इत्यादी. स्वभाववादांत जग झालेले मानले जाते. नैय्यायिक योगी सांख्यादिक केलेले मानतात, तर वेदान्ती भासलेले असे मानतात. भासलेली वस्तू प्रमात्याला अज्ञानाने भासते. 'आपुलिया अज्ञानासाठी | नव्हता थांबला किरीटी |' असे न मानले तर ज्ञानाने मोक्ष सिद्धच होत नाही. पण'तमेव विदित्वा अति मृत्युमेति |' इत्यादि श्रुतिज्ञानानेच मोक्ष मानतात. याकरिता श्रुतार्थापत्तीनेच संसार हा अज्ञानकार्यच मानावा लागतो..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment