जीव हा ज्ञान, विज्ञान व अज्ञानात असतो. ज्ञान म्हणजेच स्वरूपस्थिती तेथे जाणीव (वृत्ती) नाही. विज्ञान म्हणजे प्रपंच, 'येर प्रपंच ते विज्ञान |' अज्ञान म्हणजे प्रपंचाच्या ठिकाणी सत्यत्वबुद्धी. हे जरी खरी आहे तरी असे दिसून येते की जीव अज्ञानात वा विज्ञानात कोठेही असो तो आपण ज्ञानातच आहो असे समजत असतो. याचे एक खरे कारण आहे की ज्ञान हे समान आहे. म्हणजे विज्ञान वा अज्ञान यात सामान्य ज्ञान आहेच. त्याचा तो प्रभाव आहे.
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
No comments:
Post a Comment