संसारात मनुष्य तृप्त नसतो. तो परमार्थाविषयी तृप्त असतो. म्हणजे संसार कितीही केला तरी करावाच वाटतो. कितीही मिळवले तरी मिळवावेच वाटते, भोगले तरी भोगावेच वाटते. परमार्थ मात्र थोडा केला तरी पुरेसाच वाटतो. हीच तृप्ती, पण ही खरी नव्हे. वस्तुत: हे बरोबर नाही. संसारात प्राप्त भोगाने मनुष्याने तृप्त असावे, "ठेविले अनंते तैसेची राहावे" व पुरुषार्थसाधनात अतृप्त असावे. म्हणजे कितीही पारमार्थिक साधने केली तरी करावीच वाटावीत. कारण त्यास फलरूपत आहे..
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
No comments:
Post a Comment