Sunday, 25 September 2016

अध्यात्मिक विचारधारा २४

ज्ञान व सत्य याचे जवळचे नाते आहे. किंबहुना ते सत्य असेल तरच ज्ञान व असत्य असेल तर अज्ञान ठरते.
उदा. गणितात बे दुणे चार हे ज्ञानही आहे व ते त्रिकालाबाधित सत्यही आहे. कारण केव्हाही कोठेही कोणीही बे दुणे पाच करू शकत नाही. पण हा सिद्धान्त अद्वैत वेदान्तशास्त्रातच यथार्थरित्या संभवतो. इतर मतात सत्य व ज्ञान भिन्न अधिकरणात राहू शकतात..!! * सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.

No comments:

Post a Comment