Sunday, 25 September 2016

अध्यात्मिक विचारधारा १८

स्वहित हा शब्द नेहमी वापरला जातो व त्याची अपेक्षाही सर्वांच्याकडून होते. पण त्याचे स्वरूप मात्र कळत नाही. म्हणून ते प्राप्त होत नाही. कारण स्वहित हे स्वचे जे स्वरूप ठरेल त्यावर अवलंबून राहील.
स्व म्हणजे देह, इंद्रिये असे मानले तर विषयोपभोग, इंद्रियतृप्ति हेच हित होईल. पण या भोगाने देहाचेही हित झालेले दिसत नाही. कारण देहासही वार्धक्य, रोग, मृत्यू इत्यादि होतातच. तसेच
स्व म्हणजे मन म्हटले तर ते जड आहे. त्यास स्वतःच्या हिताहिताचे ज्ञान असणे शक्य नाही. तसेच ते कारण आहे, कर्ता नाही. 'स्व' शब्द आत्मवाची आहे. आत्म्याचे हित त्याच्या स्वरूपज्ञानातच आहे. कारण स्वरूपविस्मृतीने बंध तर स्वरूपसाक्षात्काराने मोक्ष हेच आत्महित आहे..!! -सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.

No comments:

Post a Comment