सर्व लोक संसार करतात, पण संसाराला जाणत नाहीत. सर्वांना संसाराची खरी ओळख म्हणजे ज्ञान असते तर 'यस्तं वेद स वेदवित्' (जो त्या संसारास जाणतो तो वेदवेत्ता, सर्वज्ञ होय) असे श्रीकृष्णांनी गीता अ. 15 च्या प्रथम श्लोकात म्हटलेच नसते. जाणणे याचा अर्थ विशेष ज्ञान. एखादी वस्तू कार्य असेल तर तिचे कारण कोण ? संबंध काय ? सत्य का असत्य इत्यादि यथार्थ ज्ञान म्हणजे जाणणे. तसे संसाराचे यथार्थ ज्ञान सर्वांना नाही..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment