Sunday, 25 September 2016

अध्यात्मिक विचारधारा २२

पाणी गढूळ झाले तर निवळीचे बी त्यात उगाळून घातले असता गाळ खाली बसतो. पुन्हा ढवळले की गाळ वर येतो. तसेच चित्तातील विकाराने ते गढूळ झाले तर योगादि साधनांनी तो गाळ खाली बसतो. तेवढ्यापुरते ते स्वच्छ झाल्यासारखे भासते, पण पुन्हा चित्त विक्षिप्त वृत्तीने मुक्त झाले की ते मलिन बनते.
म्हणून पवित्रता ही केवळ ज्ञानैक साध्य आहे असे गीतेत म्हटले आहे. 'नहि ज्ञानेन सदृश्यं पवित्रमिह विद्यते |' - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.

No comments:

Post a Comment