जीवनाकरिता सर्व आहे. 'आत्मनमस्तुकामाय सर्व प्रियं भवति |' पण जीवन कशाकरिता आहे हा प्रश्न कोणी सोडविला आहे काय? जीवनाकरिता सर्व संसार संसाराकरिता व जीवन असे म्हटले तर अन्योन्याश्रय दोष येतो तसेच संसारातील कोणती वस्तू जीवनाकरिता आहे की जिचा जीव कधीही त्याग करू शकत नाही? याचे उत्तरही निश्चितपणे देता येत नाही. संसार हेच जर जीवनाचे ध्येय असते तर ऋषी, मुनी, साधुसंत संसाराच्या मागे लागले असते.
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
No comments:
Post a Comment