संसारातील ज्ञान न संपणारे म्हणून क्रियाही न संपणारीच असते, ज्ञान संपत नाही. याचा अर्थ ज्ञेयानुसार ज्ञान होत असते. ज्ञेय अनंत आहेत. म्हणून त्यांची ज्ञानेही अनंत आहेत. त्या अनंत ज्ञेयाच्या ज्ञानानुसार त्यांची प्राप्ती होण्याकरिता केल्या जाणाऱ्या क्रियाही अनंत होतात. ज्ञान, क्रिया व क्रियेचे फळ भोगण्याकरिता देह, पुन्हा ज्ञान, पुन्हा क्रिया, हे रहाटगाडगे अखंड चालू असणे यासच संसार म्हणावे, 'वृत्ति ऐसे मन धरती | मना ऐसी क्रिया करिती | केलिया ऐसी वरती | मरौनि देहे ||' असे श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात..
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
No comments:
Post a Comment