प्रपंच व परमार्थातील एक फरक लक्षात ठेवण्यासारखा आहे. प्रपंचात ज्ञानानंतर क्रिया होत असते किंबहुना क्रिया न झाली तर ते ज्ञानही व्यर्थ समजल्या जाते. समोर ताट वाढलेले आहे, त्यातील पक्वान्नाचे ज्ञानही झाले आहे. पण भक्षणाची क्रिया न झाली तर तृप्ती नाही. अशी आणखीही अनेक उदाहरणे देता येतील. यासच 'आवडे ते वृत्ति किरिटी | आधी मनौनीचि उठी | मगते वाचा दिठी | करासी ये||' असे श्रीज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे. मात्र ज्ञानानुसार होणारी क्रिया त्या ज्ञानाच्या प्रकारावर अवलंबून असते. ते ज्ञान जसे सात्त्विक, राजस अथवा तामस असेल तद्वत् क्रियाही तशीच घडते..!
-सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
No comments:
Post a Comment