संसारात बुभुक्षू (भोगासक्त) वमुमुक्षु असे दोन प्रकारचे लोक आहेत. बुभूक्षूत दोन प्रकार आहेत. मुमुक्षुत्वयोग्य व मुमुक्षुत्व अयोग्य. ज्यांचे पूर्व संस्कार चांगले आहेत, ज्यांची सद्वासना आहे, ज्यांना सत्संग व सच्छास्त्र श्रवणाची आवड आहे, ते मुमुक्षुत्व योग्य होत. तसे नसते तर सर्वच मुमुक्षु झाले असते. मुमुक्षुतही दोन प्रकार आहेत.स्वतंत्र प्रज्ञ व परतंत्रप्रज्ञ. असंभावना, विपरित भावना ज्यांना बाधा करू शकत नाहीत, केवळ महावाक्यश्रवणानेच ज्यांना तत्काल बोध होत नाही. त्यांना श्रवण, मनन, निदिध्यासन किंवा योगध्यानादि साधनांचे अवलंबन करावे लागते, त्यांना परतंत्र म्हणतात..!!
- सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment