Tuesday, 4 October 2016

अध्यात्मिक विचारधारा ७४

खरे पाहिले असता हा पिंजराही कल्पनेचाच आहे. तो मुळात नाहीच. जीव भ्रमाने आपण अडकलो असे समजतो. श्रीतुकाराममहाराज म्हणतात, 
'शुक नळिकान्याये गुंतलासी काय | विचारूनि पाहे मोकळिया ||'
     न कळतच जाळ्यात किंवा पिंजर्‍यात पशु पक्षी अडकतात. तसा जीवही न कळत या संसारपाशात अडकला आहे. 'पाहे गुंतलो नेणतां |' तु.म.

           - सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर

No comments:

Post a Comment